अन् शिंदे साहेब रात्री दोन वाजता मदतीला धावून आले; अब्दुल सत्तारांनी सांगितला एकनाथ शिंदेंचा ‘तो’ किस्सा  

| Updated on: Sep 24, 2022 | 11:12 AM

मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेंच कौतुक केलं आहे. शिवसैनिकांवर कधीही अन्याय होणार नाही, आणि शिवसैनिक देखील कोणावर अन्याय करणार नाहीत, हीच शिंदे साहेबांची भूमिका असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

Follow us on

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एकनाथ शिंदेंच (Eknath Shinde) कौतुक केलं आहे. शिवसैनिकांवर कधीही अन्याय होणार नाही, आणि शिवसैनिक देखील कोणावर अन्याय करणार नाहीत, हीच शिंदे साहेबांची भूमिका आहे. मी तर अडीच वर्षांचा शिवसैनिक आहे. मात्र आपल्या भगिनी भावना गवळी (Bhavna Gawli) या गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या खासदार आहेत. त्यांना जेव्हा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तेव्हापासून त्या शिवसैनिक आहेत. मात्र जेव्हा त्यांच्यावर संकट आले तेव्हा त्यांच्याशी बोलायला शिवसेना पक्षप्रमुखांना दोन मिनिटांचा वेळ देखील नव्हता. भावना गवळी या रात्री दोन वाजता एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्या आणि एकनाथ शिंदे यांनी रात्री दोन वाजता त्यांना विचारले ताई बोला तुमची काय अडचण आहे?  संकट येतात, संकट जातात मात्र जर त्या शिवसेनेच्या पाच टर्म खासदार राहूनही त्यांचे हे हाल असतील तर मी तर अडीच वर्षांचा शिवसैनिक माझी काय अवस्था होईल? याचा अंदाज मी तेव्हाच केल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.