Aryan Khan Walks out of Jail | आर्यन खान तुरुंगाबाहेर, ‘मन्नत’कडे रवाना
आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुंबई: आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. थोड्याच वेळात या दोघांचेही वकील कोर्टात पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करतील. त्यानंतर या दोघांची तुरुंगातून सुटका होईल. मात्र, या दोघांची आजच सुटका होणार की त्यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा यांच्या जामीन प्रक्रियेला थोड्याच वेळात होणार सुरुवात होणार आहे. अरबाजचे वडील अस्लम मर्चंट हे आपले वकील आणि जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहचले आहेत. मुनमुन धमेचाचे वकील रवी सिग आणि तिचा भाऊ प्रिन्स हे सुद्धा जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहोचले आहेत. अरबाज आणि मुनमुन यांनाही एक लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे. दोघांसाठी प्रत्येकी सात जण जामीनदार म्हणून राहणार आहेत.
Published on: Oct 30, 2021 12:55 PM
