Marathwada : शेतमालाला योग्य हमीभाव नाही, दोन महिन्यात तब्बल 135 शेतकऱ्यांची आत्महत्या

| Updated on: Mar 08, 2023 | 10:44 AM

कापूस, कांदा आणि उसाला योग्य भाव मिळत नसल्याने तर शेतकरी मोठ्आ आर्थिक संकटात सापडला आहे. यातून शेतकरी हा आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे.

Follow us on

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अवकाळीसह शेतमालाला हमीभावाच्या मुद्द्यावरून अधिवेशन तापण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आता सरकारला पुन्हा एकदा घेरण्यासाठी विरोधकांना आणखीन एक मुद्दा हाताशी लागला आहे. मराठवाड्या गेल्या दोन महिन्यात तब्बल 135 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कापूस, कांदा आणि उसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्आ आर्थिक संकटात सापडला आहे. यातून शेतकरी हा आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे. आता याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.