Asha Workers : प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
Asha Workers Strike : देशभरातील आशा सेविका येतया 20 मे पासून प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नावर बेमुदत संप सुरू करणार आहेत. त्याबद्दलचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविका 20 मे पासून संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारने डिसेंबरपासूनचा मोबदला आशा सेविकांना मिळालेला नाही. त्यामुळे मानधन अडकल्याने आशा सेविका व गटप्रवर्तक कर्मचारी यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. म्हणून २० मे पासून बेमुदत संपावर जाणार आहे. देशभरातील 10 केंद्रीय संघटनांनी हा सांप पुकारलेला आहे. अखिल भारतीय संयुक्त मंचच्या वतीने या संपाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याबाबत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे संपाची नोटीस देखील मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना दिली आहे. थकीत वेतनासह इतर 8 मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या आहे. दरम्यान, या संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांना फटका बसणार असून आरोग्य व्यवस्थेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published on: May 13, 2025 10:31 AM
