Ashish Shelar | शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं, शेलारांचा थेट निशाणा
श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवलाय.
महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवलाय. सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर मुंबई महापालिकेला शिवसेनेनं कुरतरडलं असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी केलीय.
Published on: Jun 23, 2021 08:57 PM
