tv9 Marathi Special Report | अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
भोंदू अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात असताना या प्रकरणात नवे दावे समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचा दावा केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भोंदू अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात असताना या प्रकरणात नवे दावे समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचा दावा केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 17 वेळा फोनवरून संभाषण झाले आहे. यापैकी एका कॉलमध्ये सुमारे 21 मिनिटे चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व कॉल्स नॉर्मल मोबाईल फोनवरून झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार यांच्यासोबतही खरात याचे कॉल्स झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, खरात आणि शिंदे यांच्यातील संवाद नेमका कशासाठी झाला होता, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
