भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकी भानगड काय?
भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या तुरुंगात आहे. सध्या अशोक खरातची कठोर चौकशी सुरु असून तो अंमलबजावणी संचालनालयाच्या रडावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अशोक खरातबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुरुंगातही अशोक खरातची चांगलीच कमाई होत असल्याचे दिसत आहे. आता ही कमाई नेमकी कशी झाली आहे.
दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या तुरुंगात आहे. सध्या अशोक खरातची कठोर चौकशी सुरु असून तो अंमलबजावणी संचालनालयाच्या रडावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अशोक खरातबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुरुंगातही अशोक खरातची चांगलीच कमाई होत असल्याचे दिसत आहे. आता ही कमाई नेमकी कशी झाली आहे. यामध्ये पत्नी आणि मुलांचाही सहभाग आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंग रोडच्या भूसंपादनात खरात यांच्या मालकीच्या विविध ठिकाणच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. त्याचे वाटप खालीलप्रमाणे होण्याची शक्यता आहे. गवळणे परिसर या भागात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातच्या नावावर असलेल्या जमिनीच्या बदल्यात त्यांना 82 लाख 83 हजार रुपये मिळणार आहेत.
पाथर्डी शिवारात असलेल्या जमिनीपोटी अशोक खरातची कन्या तृप्तवाला खरात आणि सृष्टी खरात यांना तब्बल 1 कोटी 82 लाख रुपये मिळण्याचे निश्चित झाले आहे.
एकूणच या प्रकल्पातून खरात कुटुंबाला सुमारे तीन कोटींच्या आसपास रक्कम मिळणार असल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला.
