Ashok Kharat Latest Update | सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल
लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचा लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातवर आता 13वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध नवा गुन्हा दाखल झाला आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर आठ लैंगिक अत्याचाराचे, तीन ते चार फसुवणूकीचे तर एक हनी ट्रॅपचा असे बारा गुन्हे दाखल होते आता त्याच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरातच्या गु्न्हांची काही सीमाच नाही असे दिसून येत आहे. आता त्याच्यावर ईडीकडून ‘एसीआयआर’ म्हणजेच मनी लाँड्रिंगचा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसतंय. ईडीने या मनी लाँड्रिंगच्या संबंधातील प्राथमिक तपासही सुरु केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान त्याच्या मालमत्तेची तसेच इतर असेट्सबाबत कसून चौकशी केली जात आहे. विशेष पोलीस पथकाकडून सुरु असलेल्या या तपासात आणखी सखोल माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 06, 2026 3:08 PM
Follow Us
