Video : …तर जलिलांनी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं- रावसाहेब दानवे

| Updated on: Aug 06, 2022 | 12:03 PM

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना औरंगजेबाचा (Aurangzeb) एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद (Aurangabad) करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. औरंगाबाद शहराच्या नावावरून काल खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. भाजप आणि शिवसेना केवळ राजकीय फायद्यासाठी नामांतराची प्रक्रिया करत आहेत, […]

Follow us on

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना औरंगजेबाचा (Aurangzeb) एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद (Aurangabad) करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. औरंगाबाद शहराच्या नावावरून काल खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. भाजप आणि शिवसेना केवळ राजकीय फायद्यासाठी नामांतराची प्रक्रिया करत आहेत, पण सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही, असा आरोप खा. जलील यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी खा. जलील यांना हा सल्ला दिला. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याची आमची मागणी होती. ती पूर्ण झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील प्रस्ताव मंजुरीवेळी उपस्थित होते. त्यामुळे तेदेखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.