Dombivli : रिक्षा-कारची धडक, ऑटो चालकाला डांबून बेदम मारहाण, नंतर असं काय झालं की चालकानं संपवलं स्वतःचं आयुष्य?
“जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा आत्महत्या केलेल्या रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांच्या नातेवाईकांनी दिलाय. नेमकं काय घडलं बघा?
डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कार चालकाने मारहाण केल्याने रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. डोंबिवलीतील मोठा गाव परिसरातील रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांनी आत्महत्या केली आहे. डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात रिक्षाची आणि कारमध्ये धडक झाली. या अपघातानंतर कार चालकाने 70 वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण केली. इतकंच नाहीतर दोन लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची केली मागणी या कार चालकाकडून करण्यात आली होती.
दरम्यान, दोन लाख रूपये आणायचे कुठून? या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली. रात्री ३ वाजता रिक्षा चालकाची सुटका झाल्यानंतर रिक्षा चालकाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. तर डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस स्थानकात रिक्षा चालक आणि नातेवाईकांची गर्दी जमली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
