Bacchu Kadu : बच्चू कडूंचं आंदोलन पेटलं; दिला टोकाचा इशारा, म्हणाले जास्त त्रास दिला तर…
मुख्यमंत्री कधी बोलणार याची राज्यातील शेतकरी वाट पाहत आहेत. सहा महिने झालेत मजुराला मजुरी भेटत नाही. दिव्यांगाला पगार नाही अशा परिस्थितीत ते कसे जगणार? असे म्हणत बच्चू कडूंनी सरकारला सवाल केलाय
जास्त त्रास दिला तर मुंबई गाठणार असल्याचे म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी थेट टोकाचा इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अशातच बच्चू कडू यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून त्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. ‘आजच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. पालकमंत्री इथून गेले पण ते भेटायला आले नाहीत. जिल्हाधिकारी येतात फोन कनेक्ट करून देतात पण ते बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्री अकोला येथे आहे. काल राम ठाकरे नावाचा शेतकरी मरण पावला. त्याच्या छातड्यावर पाय ठेवून कार्यक्रम घेण्याची तयारी दाखवताय. कोणत्या मानसिकतेने राज्य सरकार काम करतंय.’, असं म्हणत बच्चू कडूंनी टीका केली आहे.
