Bachchu Kadu : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र; काय दिली पहिली प्रतिक्रिया
Bachchu Kadu disqualified : अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र ठरलेले आहेत. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र ठरलेले आहेत. विभागीय सहनिबंधक यांनी हा मोठा निर्णय दिलेला आहे. न्यायालयाच्या एका वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठ दणका म्हणावं लागणार आहे.
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरलेलं आहे. न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी केलेल्या आंदोलनांचा हा परिणाम आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. या निर्णयात दबावतंत्र वापरलं गेलं असल्याचंही बच्चू कडू म्हणाले आहेत. सुनावणी अधिकारी हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे. व्यवस्थित काही करायचं नाही म्हणून सुरू केलेली ही मोहिम आहे, असा आरोप कडू यांनी केला आहे.
