संभाजीनगरमध्ये बंजारा समाज आक्रमक! एसटीमधून आरक्षणाची मागणी

संभाजीनगरमध्ये बंजारा समाज आक्रमक! एसटीमधून आरक्षणाची मागणी

| Updated on: Sep 12, 2025 | 1:41 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाने एसटी आरक्षणासाठी मोठे आंदोलन केले आहे. केमरी चौकात रस्ता रोको आणि जालना रोडवर चक्काजाम करण्यात आला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आदिवासी म्हणून ओळखले जाणारे हे समाज महाराष्ट्रात ओबीसी म्हणून वर्गीकृत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. केमरी चौकात रस्ता रोको आणि जालना रोडवर चक्काजाम करून निषेध व्यक्त करण्यात आला. मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे कार्यकर्ते आणि महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांची मागणी आहे की तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आदिवासी म्हणून असलेला हा समाज महाराष्ट्रातही एसटी वर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकेल. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

Published on: Sep 12, 2025 01:41 PM