tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बिनविरोध निवडणूक नाहीच?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ती बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यासाठी पुढाकार घेत आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ती बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यासाठी पुढाकार घेत आहेत. स्वतः सुनेत्रा पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेसने बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, बारामती मतदारसंघातून तब्बल 19 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. बारामतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला जात असला, तरी राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली, तरी अखेरच्या क्षणी काँग्रेस माघार घेते का?, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
