Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समोर येताच मोठी खळबळ उडाली.
बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समोर येताच मोठी खळबळ उडाली. बारामतीमध्ये अपघातग्रस्त झालेलं विमान नेमकं कसलं होतं याबबात तपास सुरु करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार हे प्रशिक्षण विमान असल्याचं सांगितलं जात आहे. बारामती विमानतळावर हे शिकाऊ विमान कोसळलं आहे.
हे विमान नेमके कशामुळे कोसळले. तसेच या घटनेत पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
Published on: Aug 09, 2026 1:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
