धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? कराड सोबत असलेल्या मुंडेंच्या मालमत्तेवर टाच येणार, प्रकरण काय?

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? कराड सोबत असलेल्या मुंडेंच्या मालमत्तेवर टाच येणार, प्रकरण काय?

| Updated on: Aug 04, 2025 | 11:02 AM

धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्हा सहकारी बँकेतून 'संत जगमित्र सहकारी सूतगिरणी' साठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप आहे. ते या सूतगिरणीचे संचालक होते. या कर्जाची रक्कम सुमारे 3 कोटी रुपये असल्याची माहिती मिळतेय.

बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यासंबंधी अनेक वर्ष प्रलंबित असणारी न्यायालयीन प्रक्रिया अखेर सुरु झाली आहे. परळी येथील जगमित्र सुतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरण विधानपरिषद विरोधी पक्षनेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारी वकिलांकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. तर सरकारी वकिलांनी केलेल्या अर्जावर आज निर्णय दिला जाणार असल्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड सोबत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाकडून आदेश काढत जगमित्र सुतगिरणी प्रकरणी तीन कोटी रुपयांची वसुली करण्याकरिता धनंजय मुंडे यांचे घर संत जगमित्र सुत गिरणीचे कार्यालय तसेच, विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर या पुढे व्यवहार करता येणार नसल्याचे सांगितले आहे.

Published on: Aug 04, 2025 11:01 AM