Bhaskar Jadhav : कोण तुम्ही… मी माफी मागणार नाही, भास्कर जाधव अन् ब्राह्मण सहाय्यक संघातील वाद पेटला, बघा काय म्हणाले?

Bhaskar Jadhav : कोण तुम्ही… मी माफी मागणार नाही, भास्कर जाधव अन् ब्राह्मण सहाय्यक संघातील वाद पेटला, बघा काय म्हणाले?

| Updated on: Aug 12, 2025 | 1:12 PM

भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण सहाय्यक संघाशी वाद निर्माण झाला आहे. जाधव यांनी खोतकी प्रथेवर केलेल्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदवला आहे. भास्कर जाधव आधी नेमकं काय म्हणाले आणि आता वक्तव्य नेमकं काय केलंय बघा व्हिडीओ

भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघातील वाद पेटलाय. भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे करून माझ्यावर टीका केली आहे. असं भास्कर जाधव म्हणालेत. मी मराठा समाजात जन्माला आलो, कुणालाही घाबरणार नाही असेही जाधव यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवराय, संभाजीराजे, महात्मा गांधींनाही तुम्ही छळलं अशी टीका त्यांनी केली. खोतकीच्या वक्तव्यावरून मी अजिबात माफी मागणार नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असेही भास्कर जाधव म्हणाले.

वाद नेमका काय?

गुहागरच्या सभेत भास्कर जाधव यांनी तालुक्यातील खोतकी संपवल्याचा दावा केला होता. खोतकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला. कोकणातील खोतकी म्हणजे ब्राह्मण समजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्याने गाव चालतो. ब्राह्मण सहाय्यक संघान भास्कर जाधव यांना पत्र लिहित टीका केली. राजकीय स्वार्थासाठी आपण सामाजिक ऐक्य बिघडवणारे वक्तव्य केलं असा उल्लेख या पत्रात करण्यात आला.

तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून पराचा कावळा केला ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांच्यावर जाधवांनी पत्रातून टीका केली. हे पत्र कुठल्या आनाजी पंतांनी लिहून घेतलं असं म्हणत भाजपच्या विनय नातू यांच्यावर जाधवांनी टीका केली. भास्कर जाधवांनी कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बास असेही स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं होतं. तर जाधवांचे कार्यकर्ते शिंदे यांच्या सेनेत गेल्यानंतर जाधवांनी घेतलेल्या मेळाव्यात हे खोतकीचं वक्तव्य केलं होतं.

Published on: Aug 12, 2025 01:08 PM