Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 1 October 2021
Superfast news

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 1 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 5:36 PM

खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने काही दिवसांपूर्वी समन्स पाठवलं होतं. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) यालाही यापूर्वीच अटक केली होती.

शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे.

खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी आज भावना या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या. पण अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतरही त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही.