Navneet Rana : महाराष्ट्राबाहेर चालतं व्हावं… भिवंडीत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानं वाद ओढावून घेतला, राणांनी आझमींना सुनावलं
भिवंडीत अबू आझमी यांनी मराठी भाषेच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मराठी-हिंदी वाद पुन्हा पेटला आहे. यावर नवनीत राणा यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांना मराठीची आवश्यकता वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडावा.
भिवंडी येथे अबू आझमी यांनी मराठी भाषेच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुन्हा एकदा मराठी-हिंदी वादाला तोंड फुटले आहे. भिवंडीमध्ये मराठीची काय गरज? असा सवाल आझमींनी केला असून, मराठीत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या या भूमिकेवर अनेक स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नवनीत राणा यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना म्हटले की, “ज्यांना मराठीची आवश्यकता वाटत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडून जावे.” महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे, असेही राणा यांनी नमूद केले. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) देखील त्यांना इशारा देण्यात आला आहे.
Published on: Oct 01, 2025 02:43 PM
