Ahilyanagar | अहिल्यानगरमध्ये भाजप – राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, नगरच्या विकासाला गती मिळणार – सुजय विखे

Ahilyanagar | अहिल्यानगरमध्ये भाजप – राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, नगरच्या विकासाला गती मिळणार – सुजय विखे

| Updated on: Jan 16, 2026 | 5:45 PM

महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयावर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत हा ऐतिहासिक निकाल असल्याचे म्हटले आहे. “इतके स्पष्ट बहुमत याआधी नगरच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळाले नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.

महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयावर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत हा ऐतिहासिक निकाल असल्याचे म्हटले आहे. “इतके स्पष्ट बहुमत याआधी नगरच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळाले नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील ही युती केवळ राजकीय नव्हे, तर नैतिक युती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसाठी मनापासून काम करत होते, त्यामुळेच असा निर्णायक कौल मिळाला, असेही सुजय विखे पाटील यांनी सांगितले. “जेव्हा युती मनाने होते, तेव्हा जनतेकडूनही तसाच प्रतिसाद मिळतो,” असे त्यांनी नमूद केले. हा विजय केवळ पक्षांचा नसून नगरमधील प्रत्येक गोरगरीब जनतेचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा विजय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या निकालामुळे अहिल्यानगरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सुजय विखे पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Published on: Jan 16, 2026 05:45 PM