Devendra Fadanavis : नरकातला स्वर्ग या राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय…
संजय राऊत यांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर भाजप नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी आपलं पुस्तक ‘नरकातील स्वर्ग’ मध्ये राजकारणातील खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला असता त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडलेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, त्यांचे सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. तर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका महायुती म्हणून लढवणार का? असा सवाल देवेंद्र फडणीस यांना केला असता ते म्हणाले, आम्ही महायुतीमध्ये महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार आहोत. पण अपवादात्मक स्थितीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो तरी आम्ही सामजस्यांनी वेगवेगळे लढू पण एखाद्या महापालिकेत एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी आमच्यात सामजस्य असेल पण तसं पाहिलं तर आम्ही एकत्रितच लढू, असं फडणवीस म्हणाले.
