BJP : भाजपची सेंच्युरी…नगरपंचायत अन् नगरपरिषद निवडणुकीत कुठं-किती नगरसेवक बिनविरोध?
राज्यभरात सध्या स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आपली कंबंर कसली आहे. तर नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याचा विश्वास भाजपने व्यक्त केलाय.
भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याचा विश्वास व्यक्त केला आहे, ज्यामुळे भाजपची सेंच्युरी होईल असे म्हटले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. यात उत्तर महाराष्ट्रात ४९, पश्चिम महाराष्ट्रात ४१, कोकणात ४, मराठवाड्यात ३ आणि विदर्भात ३ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेर नगरपालिकेतून साधना महाजन, अनगर नगरपंचायतीतून प्राजक्ता पाटील आणि दोंडाईचा नगरपरिषदेतून नयनकुंवर रावल यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याच्या प्रकरणी २४ नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Published on: Nov 22, 2025 11:37 AM
