Gopichand Padalkar : सासू ख्रिश्चन, नवरा ब्राम्हण, बाप मराठा अन् आई… असं ते कॉकटेल घर…पडळकरांची नाव न घेता बड्या नेत्यांवर जहरी टीका
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शऱद पवार यांच्या कुटुंबावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. या टीकेनंतर शऱद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी पलटवार केलाय.
राज्यातील राजकारणात सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे. सत्तेतील प्रमुख नेते आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं तोंडी म्हणत असले तरी त्यांचेच आमदार राज्यातील प्रमुख नेत्यांना देखील जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
‘संकष्टीचा दिवस असतो तेव्हा उपवास असतो, मात्र तेव्हा हे कुटुंब घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. एका गटाची लोकं या मोर्च्यात पुढं पुढं करत आहेत, ते घर पण तसंच आहे. हे घरं असं की दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला मटण खाऊन जातात, तुम्हाला सगळयांना माहीत आहे ते घर कोणतं आहे ! तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई कोणी आहे असं ते कॉकटेल घर आहे’, अशा भाषेत पडळकरांनी पवार कुटुंबावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.
