Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
दिल्लीतील आंदोलनानंतर देशातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतले होते. सुमारे तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

या आंदोलनानंतर भाजपने देशभरात काँग्रेसविरोधात आंदोलन सुरू केले आहे. मुंबईत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
माध्यमांशी बोलताना अमित साटम यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी नकारात्मक राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी राहुल गांधींना परदेश दौऱ्यांबाबत माहिती सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले.
यावेळी अमित साटम यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचाही उल्लेख केला. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असल्याने देशविरोधी शक्ती भारताची वाटचाल रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनानंतर काँग्रेसनेही सरकारविरोधातील भूमिका अधिक आक्रमक केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार असून, आंदोलन, पोलिस कारवाई आणि केंद्र सरकारवर ते कोणती भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.