BJP : मोदी विष्णूचे 11 वे अवतार… ट्रम्प यांचा फोन मोदी उचलत नाहीत! भाजपच्या बड्या नेत्याचा दाव्यानं चर्चा

BJP : मोदी विष्णूचे 11 वे अवतार… ट्रम्प यांचा फोन मोदी उचलत नाहीत! भाजपच्या बड्या नेत्याचा दाव्यानं चर्चा

| Updated on: Jul 28, 2025 | 11:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे अकरावे अवतार आहेत असं वक्तव्य भाजप नेते राज पुरोहित यांनी केले. कौतुक करताना पुरोहितांनी मोदींची देवासोबत तुलना केली. ट्रम्प फोन करतात पण मोदी फोन उचलत नाहीत, असंही राज पुरोहित यांनी म्हटलंय.

भाजपच्या बड्या नेत्याने मोदींची तुलना थेट देवाशी केलीये. पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना भाजप नेते राज पुरोहित देहभान हरवून बसले. पंतप्रधान मोदी हे भगवान विष्णूचे अकरावे अवतार असल्याचं भाजप नेते राज पुरोहितांनी म्हणाले. राज पुरोहितांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं वाहिले. यावरून आता विरोधकांनी राज पुरोहितांवर टीकेची झोड उठवली. तीन महिन्यांपासून ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना रोज फोनवर फोन केले पण मोदी फोन उचलत नाही, असा दावाही राज पुरोहितांनी केलाय. याआधी ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान मधील युद्ध संघर्षादरम्यान आपणच युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता राज पुरोहितांनी केलेला हा दावा सध्या चर्चेचा विषय बनलाय.

भगवान विष्णूच्या दशावताराची भारतीय पुराणापासून अनेक धार्मिक ग्रंथात माहिती समोर येते. मत्स्य हा पहिला अवतार. त्यानंतर कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि अखेरचा अवतार हा भगवान कल्किचा असेल, असे हिंदू धर्मग्रंथात सांगण्यात आले. आता पुरोहितांनी त्यात अकरावा अवतार जोडलाय. दहावा अवतार होण्यापूर्वीच त्यांनी अकराव्या अवतारावर दावा सांगितलाय. तर दुसरीकडे एका ठिकाणी राज पुरोहितांनी थेट ट्रम्प यांच्यावरून केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हा प्रश्न उपस्थित होतोय

Published on: Jul 28, 2025 11:12 AM