Devendra Fadnavis | जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर, फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघात

| Updated on: Oct 16, 2021 | 10:27 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचलं होतं. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल करतानाच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Follow us on

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.