‘शिंदे ज्युनिअर होते, तर आदित्य ठाकरे मंत्री बनायला…’, भाजप नेत्याचा खोचक सवाल करत भुजबळांवर पलटवार

‘शिंदे ज्युनिअर होते, तर आदित्य ठाकरे मंत्री बनायला…’, भाजप नेत्याचा खोचक सवाल करत भुजबळांवर पलटवार

| Updated on: Feb 20, 2025 | 5:31 PM

छगन भुजबळांनी राऊतांच्या दाव्याला दुजोरा देत मविआ सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोकं होते. त्यावेळी एकनाथ शिंदे ज्युनिअर होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या नावाला विरोध केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसबा निवडणुकीच्या वेळी भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले नाही. तसेच मविआमध्ये शरद पवारांचा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध होता, असा सनसनाटी दावा संजय राऊतांनी केला. यानंतर छगन भुजबळांनी दुजोरा देत मविआ सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोकं होते. त्यावेळी एकनाथ शिंदे ज्युनिअर होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या नावाला विरोध केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘राजकारणात ज्युनिअर आणि सिनिअर असा विषय नसतो’, असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे ज्युनिअर होते तर आदित्य ठाकरे हे मंत्री बनायला ज्येष्ठ होते का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्याकडे कामाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांना ज्युनिअर म्हणण्याचं कारण नसल्याचे स्पष्ट दरेकर यांनी म्हटलं. बघा काय म्हणाले प्रवीण दरेकर?

Published on: Feb 20, 2025 05:31 PM