Maharashtra Politics : आगामी निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, ‘मविआ’तील नाराज अन् बडे नेते गळाला लागणार?

Maharashtra Politics : आगामी निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, ‘मविआ’तील नाराज अन् बडे नेते गळाला लागणार?

| Updated on: Jun 18, 2025 | 11:30 AM

नुकताच ठाकरे गटातून हाकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तर आगामी काळात असेच मोठे पक्षप्रवेश भाजपात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती आखण्याचे काम सुरू आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता भारतीय जनता पक्षाकडून एक मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर महाविकास आघाडीत नाराज असलेल्यांना भारतीय जनता पक्ष गळाला लावणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर महाविकास आघाडीचे बडे नेते भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांकडून सांगितली जात आहे.

Published on: Jun 18, 2025 11:30 AM