Devayani Farande : देवयानी फरांदे भावूक; भाजप पक्षप्रवेश अन् निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक, स्पष्ट म्हणाल्या…
नाशिकमध्ये भाजपामधील पक्षप्रवेशावरून देवयानी फरांदे भावूक झाल्या. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, ही त्यांची भूमिका आहे. काही दलालांनी स्वार्थापोटी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. चाळीस वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या फरांदे यांनी, पक्ष मोठा होत असताना जुन्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जाऊ नये अशी मागणी केली आहे.
नाशिकमध्ये भाजपामधील पक्षप्रवेशावरून माजी नगरसेविका देवयानी फरांदे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता नाशिकमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये, ही माझी भूमिका असल्याचे फरांदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी काही दलालांनी स्वार्थातून राजकारण केले असा आरोप केला. कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते योग्य नाही. गेली चाळीस वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये एक नगरसेविका म्हणून भ्रष्टाचाराविरोधात आणि अन्यायाविरोधात संघर्ष करत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांच्याकडे कार्यकर्त्यांची भूमिका पोहोचवणार असल्याचे फरांदे म्हणाल्यात. गिरीश महाजन यांनी उमेदवाऱ्या अंतिम नसतील असे सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले.
