हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुख प्रकरणावर राम कदमांची प्रतिक्रिया

हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुख प्रकरणावर राम कदमांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 10:57 AM

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर ईडीने अटक केली आहे. 100 कोटी रुपयांचे कथित वसुली आदेश दिल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने देशमुखांना रात्री 12 वाजता अटक केली. त्यानंतर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विटरवरुन काही सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर ईडीने अटक केली आहे. 100 कोटी रुपयांचे कथित वसुली आदेश दिल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने देशमुखांना रात्री 12 वाजता अटक केली. त्यानंतर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विटरवरुन काही सवाल उपस्थित केले आहेत. हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? असा सवाल कदम यांनी विचारला आहे.“पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?” अशा शब्दात राम कदम यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Published on: Nov 02, 2021 10:57 AM
Follow Us