Nishikant Dubey : आपल्या घरात कुत्राही वाघ, हिंमत असेल तर… भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य अन् ठाकरे बंधूंवर निशाणा
हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना आव्हान देत दुबे म्हणाले, जर हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादात उडी घेत एक ट्विटही केले.
सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी असा भाषा वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत असून हा भाषा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. अशातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे. इतकंच नाहीतर त्यांनी ठाकरे बंधूंवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्विट करत असंही म्हटलं की, “मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना देखील मारून दाखवा. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ आता ते तुम्हीच ठरवा.” दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदीविरुद्ध एकत्र आल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हे वक्तव्य केल्याने सध्या ते चर्चेत आले आहेत.
हिंदी भाषी लोगों को मुम्बई में मारने वाले यदि हिम्मत है तो महाराष्ट्र में उर्दू भाषियों को मार कर दिखाओ । अपने घर में तो कुत्ता भी शेर होता है? कौन कुत्ता कौन शेर खुद ही फ़ैसला कर लो
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
