EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब – नितेश राणेंचा हल्लाबोल

EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब – नितेश राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Feb 08, 2025 | 2:47 PM

दिल्लीत भाजपने विजयाच्या दिशेने वाटचाल केली. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. आधी हरियाण, मग महाराष्ट्र आणि आता दिल्ली, आज पूर्ण देश हा मोदींच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवताना दिसत आहे. दिल्लीच्या विजयाने त्यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झालं आहे.

आज दिल्लीत भाजपने विजयाच्या दिशेने वाटचाल केली. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. आधी हरियाण, मग महाराष्ट्र आणि आता दिल्ली, आज पूर्ण देश हा मोदींच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवताना दिसत आहे. दिल्लीच्या विजयाने त्यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झालं आहे असं भाजप नेते नितेश राणे म्हणाले. कालपासून जे 3 इडियट्स आले, काल ती माकडं जे काही बोलायचा प्रयत्न करत होते, आज ती माकडं कुठे गेली ? राहुल गांधींच्या पक्षाचा तर एकही उमेदवार निवडून आलेला दिसत नाही, अशा शब्दांत नितेश राणेंनी काँग्रेससह विरोधकांवर हल्ला चढवला. ही यांची राजकीय क्षमता, ही यांची लायकी आणि हे नरेंद्र मोदींवर बोलतात, त्यांना सुनावतात, ते ईव्हीएमवर बोट ठेवतात. लोकांची मनं जिंकायची नाहीत, आणि नुसतं ईव्हीएमबाबत बोंबलायचं, असे टीकास्त्र राणेंनी सोडलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव झाला असून 27 वर्षांनी राजधानीत कमळ फुललं आहे.या निवडणुकीत मतादारांनी भाजपावर विश्वास दाखव त्यांना भरघोस मतदान केलंय. आपचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा झटका बसलाय.

 

Published on: Feb 08, 2025 02:47 PM