Malvan Money Seized : निलेश राणेंच्या धाडीनंतर बंधू नितेश राणे विजय केनवडेकरांच्या थेट घरी, कोकणात वातावरण तापलं

Malvan Money Seized : निलेश राणेंच्या धाडीनंतर बंधू नितेश राणे विजय केनवडेकरांच्या थेट घरी, कोकणात वातावरण तापलं

| Updated on: Nov 27, 2025 | 4:38 PM

मालवणमध्ये २५ लाख रुपये सापडल्याच्या घटनेनंतर भाजयुमोचे नेते नितेश राणे यांनी विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. निलेश राणे यांनी या घटनेचा पर्दाफाश केला होता आणि आता नितेश राणे केनवडेकर यांना आधार देत प्रकरणाची माहिती घेत आहेत.

मालवणमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  भाजपच्या विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी २५ लाख रुपये सापडल्याच्या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांना भेट दिली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी नितेश राणे केनवडेकर यांच्या घरी पोहोचले होते. गेल्या २४ तासांत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी रक्कम जप्त केली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. नितेश राणे यांनी विजय केनवडेकर आणि बंटी केनवडेकर यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. ही रक्कम व्यवसायाशी संबंधित असावी, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

दुसरीकडे, निलेश राणे यांनी पोलीस ठाण्यात एफआयआरची मागणी केली असून, निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मालवणमध्ये पैशांच्या वाटपाबाबत चिंता व्यक्त करत भरारी पथके वाढवण्याची मागणी केली होती. यानंतर आता मालवणमध्ये भरारी पथकांची संख्या वाढवून पाच करण्यात आली आहे.

Published on: Nov 27, 2025 04:38 PM