महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच…

महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच…

| Updated on: Jun 03, 2026 | 4:01 PM

राज्यात सगळीकडे विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे, अशात महायुतीमधील एक नेता मोठी डोकेदुखी ठरल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे.

राज्यात सगळीकडे विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे, अशात महायुतीमधील एक नेता मोठी डोकेदुखी ठरल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजपच्या महायुतीतील उमेदवारांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी आज बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे, तर अनेक वरिष्ठ नेते बंडखोरांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

अलीकडेच उदय सामंतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 3 ठिकाणी झालेली बंडखोरी शमवण्यात पक्षाला यश आले आहे, तर इतर ठिकाणीही लवकरच मतभेद संपुष्टात येतील  अशात भाजप नेते नितीन भुतडा थेट नॉट रिचेबल झाल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे नेते यवतमाळमधील जागेसाठी इच्छुक होते, मात्र ही जागा शिवसेनेसाठी सुटली. यानंतर त्यांनी बंड करत अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी ते मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता महायुतीत मोठं राजकीय वादळ येणार की काय, अशी शंका वर्तवली जात आहे.

Published on: Jun 03, 2026 4:01 PM
Follow Us