मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने…नेमकं काय घडतंय?

मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने…नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jul 02, 2026 | 4:28 PM

मुंबईत मुसळधार पावसामुळे साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. खैरानी रोड परिसरात पाण्याने भरलेल्या रस्त्यावर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पाण्यातून रस्ता ओलांडत असताना पाण्याखाली असलेला मॅनहोल दिसला नाही. त्यामुळे तो थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये पडला. ही संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दल आणि प्रशासनाने बचावकार्य सुरू केले, मात्र संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला.

या गंभीर घटनेनंतर BMC आयुक्त अश्विनी भिडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील सर्व धोकादायक मॅनहोल, पाणी साचणारे भाग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना देणार सांगितले जात आहे.

Published on: Jul 02, 2026 4:27 PM
Follow Us