BMC Election Result 2026: मुंबई प्रभाग 185 मध्ये भाजपला मानावी लागली हार! रवी राजा यांचा पराभव
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या कलांनुसार, प्रभाग 185 मध्ये भाजपच्या रवी राजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे, जो भाजपसाठी धक्का मानला जात आहे. मुंबईत भाजप 95 जागांवर आघाडीवर असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मनसेनेही नऊ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत असून, ठाकरे बंधूंच्या एकजुटीचा त्यांना फायदा होत असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 च्या निकालांचे कल समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 185 मध्ये भाजपसाठी धक्कादायक निकाल लागला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले रवी राजा यांचा येथे पराभव झाला आहे. रवी राजा यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. याच प्रभागात ठाकरेंचे उमेदवार जगदीश शिवालप्पी यांनी विजय मिळवला आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील एकूण 227 पैकी 221 जागांचे कल हाती आले आहेत. भाजप आणि शिंदे युती 126 जागांवर आघाडीवर आहे, तर एकट्या भाजपला 95 जागांवर आघाडी मिळाल्याने ते मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरले आहेत. ठाकरे बंधू (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे) 72 जागांवर आघाडीवर आहेत. मनसेचे नऊ उमेदवार मुंबईत आघाडीवर असून, प्रभाग 106 मध्ये सत्यवान दळवी आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागत आहे. दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 13 जागांवर आघाडीवर आहेत. प्रभाग 105 मध्ये भाजपच्या अनिता वैती आघाडीवर आहेत.
