बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?
राज्यात पहिल्यांदाच 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमदेवारांवर दबाव टाकून आणि लालच देऊन त्यांना अर्ज माघारी घ्यायला सांगण्यात आले. त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
राज्यात पहिल्यांदाच 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमदेवारांवर दबाव टाकून आणि लालच देऊन त्यांना अर्ज माघारी घ्यायला सांगण्यात आले. त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या बिनविरोध निवडीला मनसेने नुसता विरोध केला नाही तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी थेट हायकोर्टात धाव घेऊन बिनविरोध निवडीला आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने जाधव यांची याचिका फेटाळून लावली. कोर्टाने जाधव यांना दंड आकारला असून त्यांचे वकील असीम सरोदे यांनाही फटकारलं आहे.
Published on: Jan 14, 2026 01:14 PM
