Breaking | काबूलमधून भारतीय नागरिकांना केलं एअरलिफ्ट, एअरफोर्सचं C-17 ग्लोबमास्टर दिल्लीत परतलं

| Updated on: Aug 16, 2021 | 10:14 PM

अफगाणीस्तानातील भारतीय नागरिकांना घेऊन हे विमान दिल्लीत दाखल झालं आहे. 130 भारतीय नागरिक काबूलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात सुखरुपपणे परत आणायचं होतं. त्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. दुपारीच हे विमान काबूलमध्ये दाखल झालं होतं. भारतीय दूतावासात जे अधिकारी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी हे विमान गेलं होतं.

Follow us on

काबूलमधून भारतीय नागरिकांना एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. C-17 ग्लोबमास्टर हे वायू दलाचं लढावू विमान दिल्लीत परतलं आहे. अफगाणीस्तानातील भारतीय नागरिकांना घेऊन हे विमान दिल्लीत दाखल झालं आहे. 130 भारतीय नागरिक काबूलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात सुखरुपपणे परत आणायचं होतं. त्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. दुपारीच हे विमान काबूलमध्ये दाखल झालं होतं. भारतीय दूतावासात जे अधिकारी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी हे विमान गेलं होतं. अमेरिकन सैन्यानं काबूल विमानतळ हाती घेतल्यानंतर अखेर भारतीय नागरिक आणि अधिकाऱ्यांना परत आणण्यास भारतीय वायू दलाला शक्य झाल्याचं पाहायला मिळत आहे.