Breaking | MPSC परीक्षेसंदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार
विरोधी पक्ष असलेल्या भाजपनंही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. अशावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तसंच एमपीएससी परीक्षेबाबत एक समिती गठीत केली जाणार असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुण्यातील तरुण स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केलीय. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनंही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. अशावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तसंच एमपीएससी परीक्षेबाबत एक समिती गठीत केली जाणार असल्याचं कळतंय.
Published on: Jul 04, 2021 10:51 PM
