Mayawati : बुवा-बबुआत कटूता…भाजपसोबत गोडवा? मायावतींकडून BJP चं कौतुक अन् सपावर तोंडसूख

Mayawati : बुवा-बबुआत कटूता…भाजपसोबत गोडवा? मायावतींकडून BJP चं कौतुक अन् सपावर तोंडसूख

| Updated on: Oct 10, 2025 | 3:24 PM

तब्बल दशकभरानंतर मायावतींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय होत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले, तर समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. पक्षाचा जनाधार गमावल्यानंतर मायावती पुन्हा जनाधाराला साद घालत आहेत. पुतण्या आकाश आनंदला भावी वारसदार म्हणून अप्रत्यक्षपणे समोर आणल्याचीही चर्चा आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात तब्बल दशकभरानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत दिले आहेत. कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त लखनऊमध्ये आयोजित एका मोठ्या सभेत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे, मायावतींनी यावेळी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले, तर समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. मायावतींच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मायावतींनी भाजप सरकारने कांशीराम स्मारकांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले, तर समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात स्मारकांची उपेक्षा झाल्याचा आरोप केला. यावर अखिलेश यादव यांनी बसपा आणि भाजप यांच्यात “आतून साठगांठ” असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये बसपाची पीछेहाट झाली असून, मायावती आता आपला हरवलेला जनाधार परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सभेला पाच राज्यांतून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Published on: Oct 10, 2025 03:24 PM