दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान

दिल्लीत लाल किल्ला परिसरात कार स्फोटाने खळबळ, अनेक कारचे झाले नुकसान

| Updated on: Nov 10, 2025 | 9:41 PM

दिल्लीच्या लाल किल्ला परिसर सोमवारी सायंकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटांनी हा व्हीआयपी परिसर हादरला आहे. या स्फोटाचे कारण नेमके समजलेले नाही. या प्रकरणता सर्व तपास पथके घटना स्थळी रवाना झाली आहे.

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सायंकाळी ६.४५ वाजता हा स्फोट झाला. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की आजूबाजूच्या दोन ते तीन गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. या स्फोटात नेमके किती जण जखमी झाले आहेत याची काहीही माहिती कळालेली नाही. या परिसर रिकामा करुन बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी आले असून कसून तपासणी केली जात आहे. पार्किंगमध्ये असलेल्या ईको कारमध्ये हा स्फोट झाला असून यात एकाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा तपास केला  जात असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published on: Nov 10, 2025 07:41 PM