Caste Census  : जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार

Caste Census : जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार

| Updated on: Jun 04, 2025 | 7:13 PM

देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता 2027 मध्ये या जनगणनेला सुरुवात होणार आहे.

जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना आणि जातीय जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड आणि लदाखमध्ये 2026 ला जनगणना होईल. यात पहिलं टप्पा 1 ऑक्टोबर 2026 ला, तर दूसरा टप्पा 1 मार्च 2027 ला पूर्ण होईल, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनांमध्ये जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जनगणना कधी होणार हे निश्चित नव्हते. आता जनगणना करण्याची तारीख समोर आली असून जनगणना आणि जातीय जनगणनेला 2027 मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Jun 04, 2025 07:13 PM