CBSE Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांनो मोठी बातमी, 2026 पासून वर्षातून दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा

CBSE Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांनो मोठी बातमी, 2026 पासून वर्षातून दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा

| Updated on: Jun 25, 2025 | 6:17 PM

CBSE 10 th Class Board Exam : सीबीएसईने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 सालापासून लागू होणार आहे. फेब्रुवारी आणि मे दोन महिन्यांत इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 सालापासून दहावीची वर्षातून दोनदा परिक्षा होणार आहे. फेब्रुवारी आणि मे अशा दोन महिन्यांत इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा चालू होती. मात्र आज याबाबतचा निर्णय सीबीएसईकडून जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक आणखीन वाढली आहे. सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

Published on: Jun 25, 2025 06:17 PM