Delhi Lal Quila Blast Update : दिल्लीची ‘ती’ घटना स्फोट नव्हे तर दहशतवादी हल्ला; केंद्राकडून घोषित, स्पष्टच सांगितलं
दिल्लीतील स्फोट केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला घोषित केला आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. या स्फोटातील मृतांना सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा प्रस्तावही बैठकीत पारित झाला.
दिल्लीतील स्फोट केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले असून, राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत नमूद करण्यात आले. या बैठकीत स्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली. या प्रकरणाच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. फरीदाबादमधून २९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले आहे, जे अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूलने अल-फला युनिव्हर्सिटी आणि आसपासच्या परिसरातून जमा केले होते. मात्र, अजूनही ३०० किलो स्फोटके गायब असून त्यांचा शोध सुरू आहे.
अतिरेक्यांच्या या डॉक्टर मॉड्यूलमध्ये डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर आदिल, डॉक्टर उमर नबी आणि डॉक्टर शाहिन यांचा समावेश होता. हे डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके जमा करत होते. देशभर जैश-ए-मोहम्मदसाठी स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. उमर नबीने हल्ल्यासाठी लाल रंगाची इको स्पोर्ट्स गाडी खरेदी केली होती, जी आता पोलिसांनी जप्त केली आहे.
