काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरचा विश्वास वाढला; चंद्रकांत पाटलांचा टोला

काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरचा विश्वास वाढला; चंद्रकांत पाटलांचा टोला

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 11:37 PM

भाजपा कार्यकर्त्यांकडून भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला होता. या सत्कारानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या पायऱ्यांवर गोमूत्र आणि गुलाबजल शिंपडले. यावरून चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

पुणे : भाजप कार्यकर्त्यांकडून भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला होता. या सत्कारानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या पायऱ्यांवर गोमूत्र आणि गुलाबजल शिंपडले. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावरून काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरचा विश्वास वाढला हे पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.