Sandeep Deshpande | चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Sandeep Deshpande | चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल

| Updated on: Feb 13, 2026 | 2:59 PM

चंद्रपूरमधील भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांचा उधाण आले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेनेचे खास नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे म्हणाले की, “सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की, सुपर प्रवक्त्यांना आता सुपर उद्धव ठाकरे यांच्या नाव घेण्याची भीती वाटायला लागली आहे.

चंद्रपूरमधील भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांचा उधाण आले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेनेचे खास नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे म्हणाले की, “सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की, सुपर प्रवक्त्यांना आता सुपर उद्धव ठाकरे यांच्या नाव घेण्याची भीती वाटायला लागली आहे. चंद्रपूरमधील सगळं कांड सुपर उद्धव ठाकरे यांनी घडवून आणलं, आणि सुपर प्रवक्त्यांना या घटनेची कल्पनाही नव्हती.” त्यांनी पुढे सांगितले की, “आता चंद्रपूरचे नगरसेवकही गेले आहेत, आणि या घटनेनंतर संजय राऊत यांची अवस्था अशी झाली आहे की, ‘अग अग म्हशी, मला कुठे नेशी?’ असं वाटत आहे.” या वादामुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे.

Published on: Feb 13, 2026 02:59 PM