आम्हीही शिवसेनेतून बाहेर पडलो, पण…; शिंदेंच्या बंडावर बोलताना भुजबळांनी जुना दाखला दिला…
राष्ट्र्वादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. यावेळी त्यांनी स्वत: च्या पक्षांतराचा दाखला दिला आहे. पाहा...
मुंबई : आम्हीही बाहेर पडलो. काहींनी नवीन पक्ष काढले. पण आम्ही शिवसेनेवर दावा केला नाही, असं म्हणत राष्ट्र्वादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. यावेळी त्यांनी स्वत: च्या पक्षांतराचा दाखला दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांना सहानुभूती आहे. हे बंडखोरांच्या लक्षात येत नाही. सामान्य मनुष्य आजही सांगतो शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचीच आहे. उद्धव ठाकरेंना लोकांचा पाठिंबा आहे. हे शिंदे गटाने लक्षात घ्यायला हवं, असं भुजबळ म्हणालेत.
Published on: Feb 21, 2023 03:47 PM
