त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी… छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांना प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. गणेशोत्सवाच्या गर्दीत मुंबईत आंदोलन केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांनी जरांगेंच्या आंदोलन पद्धतीवरही टीका करत त्यांनी आपली भूमिका लोकांना समजावून सांगावी असे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भुजबळ यांनी गजाननाला जरांगेंना लवकर बरे करावे अशी प्रार्थना केली. जरांगे-पाटील यांनी उपोषण थांबवून तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. मुंबईत गणेशोत्सवानिमित्त लाखो भाविक येत असताना, याच काळात आंदोलन केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सागितले की ‘काही लोकं म्हणतात… चर्चा कानावर येतात… छत्रपती शिवाजी महाराजांनी मुर्ती समोर असते जरांगे तीथेच तंबाखु खातात… थुंबात… काही तरीच…’
पोलिसांवर या गर्दीचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी असून, अशा वेळी आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. यापूर्वीही आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांच्या आंदोलन करण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जरांगे-पाटील कोणाचेच ऐकत नाहीत आणि त्यांच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत. लक्ष्मण हाके यांनी आपले आंदोलन थांबवले होते, मात्र जरांगे-पाटील सातत्याने हट्टवाद करत आहेत.
