Chhagan Bhujbal : ‘.. तर, माझ्या इतका आनंद कोणालाही होणार नाही’, ठाकरे बंधूंच्या युतीवर भुजबळ थेट बोलले

Chhagan Bhujbal : ‘.. तर, माझ्या इतका आनंद कोणालाही होणार नाही’, ठाकरे बंधूंच्या युतीवर भुजबळ थेट बोलले

| Updated on: Apr 20, 2025 | 4:19 PM

Chhagan Bhujbal On Thackeray Brothers Unity : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

मला ठाकरे बंधु एकत्र आले तर खूप आनंद होईल. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांना बोलून समजवण्याचा प्रयत्न केला होता. आज ते एकत्र आले तर माझ्या इतका आनंद कोणाला होणार नाही. मी आज वेगळ्या पक्षात आहे. आमच्यात मतभेद आहे. पण शिवसेनेसाठी आमच्या मनात आदर आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर निश्चितच त्यांची शक्ती देखील वाढेल असंही यावेळी भुजबळ यांनी म्हंटलं आहे. दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. राज ठाकरे यांची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

Published on: Apr 20, 2025 04:19 PM