Sanjay Shirsat : कुठलाही गुन्हेगार रस्त्यावर फिरणार नाही, तो जेलमध्ये असेल – संजय शिरसाट

Sanjay Shirsat : कुठलाही गुन्हेगार रस्त्यावर फिरणार नाही, तो जेलमध्ये असेल – संजय शिरसाट

| Updated on: May 29, 2025 | 7:47 PM

Sambhajinagar News : संभाजीनगर मधील दरोडा प्रकरणावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

शहरात जो मोठा दरोडा पडला होता .त्यानंतर एक एन्काऊंटर झालं. यानंतर अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे हे एन्काऊंटर का केलं ? कशामुळे केलं ? या सगळ्या प्रकाराचे तपशील घेतले आहेत. आज मी पोलीस आयुक्तांकडे शहरातील गुन्हेगारीवर बोलण्यासाठी आढावा बैठक घेतली असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात अमोल खोतकर या दरोड्यातील संशयित आरोपीचे एन्काऊंटर झाले होते. त्यानंतर आज संजय शिरसाट पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना भेटण्यासाठी आले होते. शहरातील वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी, कोटकर एन्काऊंटर का करावं वाटलं आणि कशासाठी याची माहिती संजय शिरसाट यांनी घेतली. यानंतर कुठलाही गुन्हेगार रस्त्यावर फिरणार नाही, तो जेलमध्ये असेल अशी माहिती संजय शिरसाठ यांनी दिली.

Published on: May 29, 2025 07:47 PM